मथुराविरहोचित दर्शन-लालसा,
(मथुरा-दर्शन करण्यासाठी भक्ताची तीव्र उत्कण्ठा)
वासंती-रास
(वसन्त ऋतु मधील रसिक लीलाएँ)
वृन्दावन रम्यस्थान, दिव्य चिन्तामणिधाम,
रतन-मन्दिर मनोहर।
आवृत कालिन्दी-नीरे, राजहंस केलि करे,
ताहे शोभे कनक-कमल ॥१॥
तार मध्ये हेमपीठ, अष्टदले वेष्टित,
अष्टदले प्रधान नायिका।
तार मध्ये रत्नासने, बसि ‘आछेन दुइजने,
श्याम-सङ्गे सुन्दरी राधिका ॥२॥
ओ रूप- लावण्यराशि, अमिय पड़िछे खसि’,
हास्य-परिहास-सम्भाषणे।
नरोत्तमदास कय, नित्यलीला सुखमय,
सदाइ स्फुरुक मोर मने ॥३॥
१. दिव्य चिंतामणींनी युक्त वृंदावन नामक सुंदर रम्यस्थान आहे. तेथे मनोहर रत्नजडित मंदिरे असून त्या दिव्य धामातून वाहणाऱ्या यमुनाजलात सुंदर राजहंस विहार करीत आहेत. त्या सुंदर जळामध्ये एक अलौकिक सोनेरी शंभर पाकळ्यांचे कमळ आहे.
२. त्या कमळाच्या मध्यभागी सोनेरी आठ पाकळ्यांचे आणखी एक कमळ आहे. त्या आठ पाकळ्यांवर ललिता, विशाखासहित आठ प्रमुख सखी (इंदुलेखा, रंगदेवी, सुदेवी, चंपकलता, चित्रा, तुंगविद्या) विराजमान आहेत. मध्यभागी रत्नजडित सिंहासनावर हे दिव्य जोडपे आहे; श्यामसमवेत सुंदर राधिका शोभत आहे.
३. माधुर्य रसातील श्री राधा-गोविंदांचे हास्य-परिहास्यांनी युक्त संवाद आणि त्यांचे रूप इतके आकर्षक आहे की, त्यातून जणू अमृतधाराच वाहत आहे. नरोत्तम दास म्हणतात, “ही दिव्यानंदांनी परिपूर्ण शाश्वत लीला सदैव माझ्या हृदयात विराजमान राहो.”